आठपैकी सात बंधारे कोरडे; १३ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: February 24, 2016 03:28 AM2016-02-24T03:28:55+5:302016-02-24T03:28:55+5:30
इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात
इंदापूर तालुक्यातील ११ गावे व २३ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ५ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तर १५ प्रस्ताव पंचायत समितीच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. ३ गावांकडून चारा छावणीची मागणी आली आहे.
तालुक्यातील कळंब, वडापुरी, शिरसटवाडी, गलांडवाडी क्र. १ (विठ्ठलवाडी), गोखळी, खोरोची, वकीलवस्ती, कौठळी, शेटफळगढे, रुई, कळस या ११ गावांना व ५७ चाळ, लालपुरी, लक्ष्मीनगर, वेताळनगर, साठेनगर, पवारवस्ती, शिंदेवस्ती, रामवाडी, पिंगळेवाडी, पांढरेवस्ती, माळशिकारेवस्ती, घोगरेवस्ती, सोपानवस्ती, खामगळवस्ती, मगरवस्ती, चोरमलेवस्ती, मारकडवस्ती, कौठी, आमराईमळा, काळेवागळेवस्ती, शिंदेवस्ती, थोरातवस्ती, मराडेवस्ती, गोसावीवस्ती, बिरंगुडी, पिलेवाडी या
२३ वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दगडवाडी, अकोले (वायसेवस्ती), घोरपडेवस्ती, व्याहळी, भोडणी या गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत.
निमसाखर, कडबनवाडी, चाकाटी, बावडा (कचरवाडी), बावडा, बिजवडी, निमगाव केतकी, पिटकेश्वर, न्हावी, काझड, सराफवाडी, सुरवड, निमगाव केतकी (कचरवाडी) तरंगवाडी, झगडेवाडी येथील प्रस्ताव पंचायत समितीमध्ये प्रलंबित आहेत. तालुक्यात १ लाख ४० हजार ६१७ पाळीव जनावरे आहेत. त्यांमध्ये १ लाख १६ हजार मोठी व २३ हजार ९०७ लहान जनावरे आहेत. तालुक्यात १ लाख १४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा मार्चअखेर पुरेल, असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.
यामधील १ हजार ९३० मेट्रिक टन चारा दररोज लागणार आहे. तालुक्यातील २२ गावे अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतात. एप्रिल महिन्यात म्हसोबाचीवाडी, लाकडी, निमगाव केतकी; तर मे महिन्यात बिजवडी, शहजीनगर, कळस, निमसाखर भागात चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, म्हसोबाचीवाडी, कळंब अकोले येथील शेतकऱ्यांनी चाऱ्याची मागणी केली आहे.
पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागातील १,२०० हेक्टर क्षेत्रावर चारापिकांसाठी बियाण्यांचा पुरवठा करण्याच्या सूचना तालुका कृषी कार्यालयाला करण्यात आल्या आहेत. ४ फेब्रुवारी रोजी खडकवासला कालव्याच्या आर्वतनाने तालुक्यातील तलाव भरण्यात आले. तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांपैकी केवळ जांब येथील बंधाऱ्यातच ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, उरलेले बंधारे कोरडे आहेत.