सप्तरंगी फिरते दिवे अन् बारा हजार पणत्या; देवदिवाळीनिमित्त उजळले पुण्यातील दत्तमंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 07:07 PM2022-11-24T19:07:07+5:302022-11-24T19:07:14+5:30

पुणे : गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराचा परिसर ...

Seven colored rotating lights and twelve thousand garlands Datta Mandir in Pune lit up on the occasion of Devdiwali | सप्तरंगी फिरते दिवे अन् बारा हजार पणत्या; देवदिवाळीनिमित्त उजळले पुण्यातील दत्तमंदिर

सप्तरंगी फिरते दिवे अन् बारा हजार पणत्या; देवदिवाळीनिमित्त उजळले पुण्यातील दत्तमंदिर

googlenewsNext

पुणे : गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. संपूर्ण मंदिरावर तेलाच्या १२ हजार ५०० दिव्यांची आकर्षक आरास हे यंदा मंदिराच्या १२५ व्या वर्षी साज-या झालेल्या दीपोत्सवाचे वैशिष्टय होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेला या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
 
बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १२ हजार ५०० सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली.
 
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही देवदिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता व मार्गशीर्ष गुरुवार मुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Seven colored rotating lights and twelve thousand garlands Datta Mandir in Pune lit up on the occasion of Devdiwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.