भारतात सात कोटी लोकांना श्रवणदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:18+5:302021-03-04T04:16:18+5:30
२०२० मध्ये कोरोनामुळे आपल्या जीवनशैलीत खूप बदल झाले. विविध कारणांनी स्मार्टफोनचा वापर प्रमाणाबाहेर वाढला. कानाला हेडफोन्स, किंवा इअर बड ...
२०२० मध्ये कोरोनामुळे आपल्या जीवनशैलीत खूप बदल झाले. विविध कारणांनी स्मार्टफोनचा वापर प्रमाणाबाहेर वाढला. कानाला हेडफोन्स, किंवा इअर बड लावणे हा एक अविभाज्य भाग झाला. ही साधने वापरायला काहीच हरकत नाही, अशा प्रकारे ऐकताना आपण आवाजाची पातळी कितीवर ठेवतो? हे फार महत्त्वाचे आहे. यासाठी एक साधा नियम लक्षात ठेवावा. कानाला हेडफोन्स लावून संगीत जरूर ऐका, पण साठ मिनिटे आणि ६०% पेक्षा कमी व्हॉल्यूमवर ठेवून संगीत ऐका. त्यानंतर कानाला २०-३० मिनिटांची विश्रांती द्या. हेडफोनमुळे ध्वनी लहरी कानाच्या पडद्याच्या अगदी जवळ जाऊन पोहचतात, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे.
जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे, ऐकणे ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही सर्व वयोगटांना आवश्यक आहे. कानांनी सतत ऐकण्यासाठी कानांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शंका आली तर कान तपासून घ्या आणि वेळीच उपचार करा.