आळेफाटामध्ये सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:28+5:302021-05-18T04:10:28+5:30
याबाबत माहिती देताना आळे ग्रामपंचायत सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, वडगाव आनंद सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले ...
याबाबत माहिती देताना आळे
ग्रामपंचायत सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, वडगाव आनंद सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले यांनी सांगितले की, कोरोना या संसर्गजन्य आजाराने रुग्णांच्या संख्येत येथे वाढ होत असल्याने कोरोना ग्रामस्तरीय समितीने हा कडक लाॅकडाऊन सोमवारपासून सात दिवस ग्रामपंचायतीच्या हद्दीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाना, वैद्यकीय सेवा, रेशनिंग दुकान, बॅंका, पतसंस्था यांच्या सेवा तसेच दूध उत्पादक व दूध संकलन केंद्र सकाळी-संध्याकाळी खते, औषध दुकाने सकाळी ८ ते ११ या सेवा सुरू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना एक हजार रुपये दंड व तसेच विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्र्यांना दोनशे रुपये दंड करण्यात येणार आहे.