इंदापूर तालुक्यात सात बाधित रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:28+5:302021-04-20T04:11:28+5:30
कोरोना रुग्ण इंदापूर तालुक्यातील गावा गावात निर्माण झाले आहेत. योग्य उपचार पद्धती तसेच दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध नाहीत. एकाच दिवसात ...
कोरोना रुग्ण इंदापूर तालुक्यातील गावा गावात निर्माण झाले आहेत. योग्य उपचार पद्धती तसेच दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध नाहीत. एकाच दिवसात 7 बाधितांच्या मृत्यू तर, 128 कोरोना बाधित रुग्ण ग्रामीण भागामध्ये निर्माण झाले आहेत. तर शहरी भागात 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे 164 रुग्ण आज नवे निर्माण झाले आहेत. असे असले तरी देखील तब्बल 116 बाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी सोडले आहेत. तालुक्यात 1538 रुग्ण उपचार घेत आहेत. इंदापूर शहरात नागरिक विनाकारण गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने राज्यात संचारबंदीचे कलम लागू केले आहे. मात्र त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आजही अनेक नागरिक विना मास्क फिरत आहेत. त्याकडे कोणत्याही प्रशासनाचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.
इंदापूर शहरात विना मास्क व मोकाट फिरणाऱ्यांमुळे गर्दी वाढली