सातशे लिटर हातभट्टी जप्त
By admin | Published: October 22, 2015 11:58 PM2015-10-22T23:58:20+5:302015-10-22T23:58:20+5:30
रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईमध्ये एका टेम्पोसह ७०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा
लोणी काळभोर : रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईमध्ये एका टेम्पोसह ७०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन परप्रांतीयांसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करत असताना राधेश्याम हरिराम प्रजापती (वय २४ वर्षे), पप्पू प्रजापती (वय २०वर्षे), दशरथ किशनलाल प्रजापती (वय २४ वर्षे, तिघेही मूळ रा. कराडीया, ता. गवरा, जि. रतलाम, उत्तर प्रदेश सध्या रा. थेऊरफाटा, हवेली) व हबीब हुसेन चौधरी (वय २५ वर्षे, रा.सय्यदनगर, हडपसर) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पवार हे, पोलीस हवालदार सुहास देवकाते, एस. टी. साळुंखे, होमगार्ड घोगे यांचेसमवेत रात्रगस्त घालताना उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्याने जात असताना कोरेगाव फाटा येथे आले असता समोरून एक टेम्पो संशयास्पद आढळला आला. पोलिसांनी टेम्पोला थांबवले. आंबट, गुळचट, उग्र स्वरूपाचा गावठी हातभट्टीच्या दारूचा वास आल्याने टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली. त्यांना मागील हौद्यात ३५ लिटर मापाची २० काळ्या रंगांची प्लॅस्टिकची कॅन आढळून आली. त्यामध्ये एकूण ७०० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू सापडली.