आई-वडिलांसह सात महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले; शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:59 AM2021-10-01T10:59:24+5:302021-10-01T11:01:29+5:30

शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जात जखमींना उपचारासाठी ससून, पुणे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिंघाचा मृत्यु झाला

The seven-month-old baby, along with the parents, was crushed by the container; Terrible accident on Shikrapur-Chakan road | आई-वडिलांसह सात महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले; शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील भीषण अपघात

आई-वडिलांसह सात महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले; शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील भीषण अपघात

googlenewsNext

शिक्रापूर(पुणे): शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील जातेगाव फाटा येथे कंटेनरची दुचाकीला बसलेल्या धडकेत आई-वडिलांसह सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये अशोक दगडू पवार, सारिका अशोक पवार व अनु अशोक पवार (वय ७ महिने) सर्व राहणार जातेगाव बुद्रुक मुळ रा.इंदिरानगर झोपडपट्टी, सांगोला  अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत शुभ्रा अशोक पवार (वय 3) वर्ष ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी शिक्रापूर चाकण रस्त्याने चाकण बाजूने अशोक पवार आणि त्याची पत्नी व दोन मुलींसह त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एम एच १६ झेड ३६०६)घेऊन जात असताना जातेगाव फाटा येथील न्यू पंजाबी ढाबा हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत होते. यावेळी पाठीमागून चाकण बाजूने आलेल्या कंटेनरची (टी एस ०७ यू एफ ९५५५) उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

यावेळी पवार कुंटूंब व दुचाकी कंटेनरच्या खाली चिरडले गेले. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जात जखमींना उपचारासाठी ससून, पुणे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिंघाचा मृत्यु झाला. शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालक बालाजी संजय येलगटे (अंजनगाव, लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Web Title: The seven-month-old baby, along with the parents, was crushed by the container; Terrible accident on Shikrapur-Chakan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.