सात-बारा उताऱ्याचा आॅनलाइन गोंधळ, दुरुस्तीसाठी धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:45 AM2018-12-06T01:45:06+5:302018-12-06T01:45:14+5:30
चुकीच्या दुरुस्त्या न करता अत्यंत घाईत जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हा संगणकीकरण पूर्ण झाल्याचे घोषित केले.
खेड : चुकीच्या दुरुस्त्या न करता अत्यंत घाईत जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हा संगणकीकरण पूर्ण झाल्याचे घोषित केले. आॅनलाईन सात-बारा उताºयातील चुकांमुळे ग्रामीण भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा महसूल प्रशासनाच्या दृष्टीने संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले खरे; मात्र हा आॅनलाइन प्रकार अनेकांची झोप उडविणारा ठरला आहे. अनेक शेतकºयांची उताºयातून नावेच गायब, तर काहींच्या नावे जमीन कमी असतानाही जास्त असल्याचे दिसत आहे. काहींमध्ये चुकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागाने रात्रंदिवस काम करून शेतकºयांचा सात-बारा आॅनलाईन संगणकीकृत केला. त्यामुळे शेतकºयांना आपला सात-बारा कुठेही पाहता येणे किंवा काढता येणे सोपे झाले. त्यासाठी शासनाने वेबसाईट केली. मात्र त्यातील नावेच गायब झाले आहे.
>महसूल विभागातील तलाठी, मंडलाधिकारी दुजोरा देताना हा आॅनलाइन गोंधळ मान्य करतात, तर ज्यांना झळ बसलीय त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. दुरुस्तीसाठी महसूल विभागाकडून संबंधितांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचेही महसूल विभागाकडून सांगण्यात
येत आहे.