बेभान ट्रकने सात वाहनांना उडवले, ब्रेक निकामी झाल्याने घटना : कात्रज-मंतरवाडी बायपासवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:41 AM2017-09-09T02:41:27+5:302017-09-09T02:41:38+5:30

कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.

 Seven vehicles were flown by unbanked trucks, accident due to breakdown: accident on Katraj-Mynwadi bypass | बेभान ट्रकने सात वाहनांना उडवले, ब्रेक निकामी झाल्याने घटना : कात्रज-मंतरवाडी बायपासवर अपघात

बेभान ट्रकने सात वाहनांना उडवले, ब्रेक निकामी झाल्याने घटना : कात्रज-मंतरवाडी बायपासवर अपघात

Next

कोंढवा : कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातात प्रकाश विलास माने (वय ३५, रा. भामेरी, इस्लामपूर) यांचा मृत्यू झाला. तर सदाशिव चौटा (रा. कल्याण) व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत.
राजकरण रामलाल कोरी (रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक कात्रजकडून खडी मशीन चौकाकडे जात असताना कोंढवा पोलीस चौकीसमोर तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याने सात वाहनांना उडविले. यात छोटा टेम्पो, स्कॉर्पिओ गाडी, कंटेनर, एक मालवाहतूक करणारा टेम्पो व मारुती कार अशा वाहनांना ट्रकने उडविले. यात टेम्पोचालक माने मरण पावला तर गाडीचालक चौटा व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत.
जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामुळे कात्रज-मंतरवाडी बायपासवर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या सहकाºयांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title:  Seven vehicles were flown by unbanked trucks, accident due to breakdown: accident on Katraj-Mynwadi bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.