सात वर्षांच्या चिमुरड्याला टेम्पोने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM2018-03-16T00:42:26+5:302018-03-16T00:42:26+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या ७ वर्षांचा बालक टेम्पोखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणेअंमलदार एम. एम. शेख यांनी दिली.
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या ७ वर्षांचा बालक टेम्पोखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणेअंमलदार एम. एम. शेख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी (दि. १५) सकाळी ११च्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडीच्या हद्दीत झाला. या अपघातात आकाश बालाजी किरदात (वय ७, रा. नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. कौडगाव, ता. केज, जि. बीड) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. नारायण जनक डोंगरे (वय ३५, रा. दवणा भगत यांच्या भाड्याच्या खोलीत, नाणेकरवाडी, चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली.
या प्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्यांची पत्नी व त्यांचा
भाचा आकाश हे शहा पेट्रोलपंपासमोर बालाजीनगर बाजूकडे रस्ता
ओलांडत असताना क्रीम रंगाच्या टेम्पोने ठोस देऊन हा अपघात केला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला.