अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:41+5:302021-04-01T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
केतन संजय कोकाटे (वय २४, रा. रेंजहिल्स खडकी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. सरकारी वकील सुनील मोरे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात सरकारी वकिलांनी दहा साक्षीदार तपासले. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल, वयाचा दाखला पुरावा कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली. २६ मे २०१४ रोजी हा प्रकार घडला.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीवर आपले प्रेम असून तिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, असे सांगितले होते. फिर्यादींनी आरोपीला मुलगी शिकत असून, लग्न करून देण्यास नकार दिला होता. त्यावेळी आरोपीने मुलीला पळवून नेईन असे बोलला होता. त्यानंतर तिला लग्नाचे अामिष दाखवून आरोपीने पळवून नेले. तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान कायदा कलम ३६३, ३६६ (अ), ३७६, ३४, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
----------------------------------------------------