आलेगाव पागात भीषण पाणीटंचाई ,पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:04+5:302021-05-08T04:10:04+5:30
या भागात शेतकरी वर्गाने ऊस, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घेतली आहे. परंतु हा तलाव आमदार अशोक पवार दिवाळीपूर्वी चासकमान ...
या भागात शेतकरी वर्गाने ऊस, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घेतली आहे. परंतु हा तलाव आमदार अशोक पवार दिवाळीपूर्वी चासकमान आवर्तन सोडून भरला होता. या भागात पाणीटंचाई तीव्र जाणवत होती. परंतु त्यानंतर या तलावात पाणी न सोडल्याने या भागातील शेतकरी वर्गाची पिके जळून चालली आहे. गेल्या आठवड्यात चारी २० नंबरला चासकमान आवर्तन सोडले होते. परंतु हे पाणी मधेच बंद केल्याने या भागात पाणी पोहचू शकले नाही. अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता पाणी सोडण्याचे पोकळ आश्वासन दिले जात आहे. आलेगावपागा परिसरातील शेतकरी यांच्या सातबारावर चासकमान भूसंपादन राखीव असा शेरा पडलेला असून ही या भागातील शेतकरी हा चासकमान पाणी आवर्तनपासून वंचित आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यास या भागातील व ओढ्या जवळील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे शेंडगेवाडी तलावात चासकमान आवर्तन सोडून भरावा, अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केले आहे.
शेंडगेवाडी तलावात पाणी सोडल्यामुळे चारी नंबर २० वरून येणाऱ्या ओढ्यालगतच्या आंबळे, न्हावरे, कोळपे वस्ती तसेच निंबाळकर तलाव भरून हे पाणी शेंडगेवाडी तलावात येत असते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल त्यांच्या पाण्यासाठी त्यात वाढ होऊन पाण्याची पातळी वाढते. चासकमानचे आवर्तन चारी नंबर २० वरून शेंडगेवाडी तलावात पाणी आमदार अशोक पवार यांनी सोडावे, अशी शेतकऱ्यांच्या वतीने भाऊसाहेब भोसले यांनी मागणी केली आहे.
आलेगाव पागा, न्हावरे येथील शिवजवळील कोरडा ठाण पडलेला शेंडगेवाडी तलाव.