काळूबाई नगर भागात सांडपाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:14+5:302021-09-10T04:14:14+5:30

आव्हाळवाडी: वाघोली (ता. हवेली) येथील काळूबाई नगरमधील अंतर्गत रस्त्यांवर मागील दीड महिन्यापासून ड्रेनेज अभावी दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत आहे. ...

Sewage road in Kalubai Nagar area | काळूबाई नगर भागात सांडपाणी रस्त्यावर

काळूबाई नगर भागात सांडपाणी रस्त्यावर

Next

आव्हाळवाडी: वाघोली (ता. हवेली) येथील काळूबाई नगरमधील अंतर्गत रस्त्यांवर मागील दीड महिन्यापासून ड्रेनेज अभावी दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत आहे. येथील रहिवाशांना साचलेल्या पाण्यामधून ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आरोग्य विभाग उदासीन असल्याने येथील रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाघोलीत कोटींची विकासकामे केल्याचा गवगवा केला जात असला, तरी अद्यापही काही ठिकाणी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघोलीतील काळूबाई नगर येथील नागरिकांना ड्रेनेजचे अर्धवट केलेल्या कामामुळे सांडपाणी पुढे जाऊ शकत नसल्याने ड्रेनेज लाईनमधून मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर गेली दीड महिन्यापासून दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. हे पाणी एवढ्या मोठ्याप्रमाणात साचले आहे की रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. या पाण्यातून नागरिक, लहान मुले, महिलांना दररोज ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचा रोग व अन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. आधीच कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबधित विभागाने लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

दीड महिन्यापासून गटाराचे पाणी साचल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंधरा दिवसांनी उपाययोजना करू असे सांगून गेले आहेत. परंतु अद्यापही काहीच केले नाही. माझी मुलगी आजारी पडली आहे.

सुशीला आलटे (रहिवाशी)

०९ आव्हाळवाडी

काळूबाई नगर येथे रस्त्यावर साचले दुर्गंधीयुक्त पाणी

090921\img_20210909_111545252.jpg

काळुबाई नगर भागात सांडपाणी चे ओढ्याचे स्वरूप

Web Title: Sewage road in Kalubai Nagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.