सिंहगड रोडवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:36 AM2018-08-29T02:36:40+5:302018-08-29T02:37:06+5:30
सामाजिक सुरक्षा विभाग : दोघांना अटक
पुणे : सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणाऱ्या स्वागत लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पदार्फाश केला आहे़ महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाºया दोघांना अटक करून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे़
मयंककुमार भगवान पांडे (वय २४, रा़ मु़ फाजनगंज, पो़ सासाराम, जि. रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा़ मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़
या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश विश्वनाथ लोखंडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, नवले पुलाजवळील स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली़ त्याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला़ एका बनावट ग्राहकाला तेथे पाठविण्यात आले़ या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला़ तेथे पुण्यात राहणाºया २८ ते ३० वर्षाच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले़ त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाºया मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता यादव अधिक तपास करीत आहेत़
मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह हे दोघेही या लॉजमधील कामगार आहेत़ गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील, असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़ या तीनही महिला गरीब घरातील असून घरोघरी मोलमजुरीचे काम त्या करतात़ त्यांना ते लॉजवर ठेवून घेऊन गिºहाईकांना त्यांच्याकडे पाठवत असे़