स्वारगेट येथे स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पदार्फाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:28 PM2018-10-03T21:28:23+5:302018-10-03T21:32:17+5:30
स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पदार्फाश केला आहे़.
पुणे : स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पदार्फाश केला आहे़. दोघांना अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गोपाळ कमल हलदर, रॉबिन थॉमस (दोघे रा़ मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. शौकत अली खान (रा़ मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकरणी संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार शकील सत्तार शेख यांनी फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल येथे आमंत्रा स्पा हे मसाज सेंटर आहे़. गेल्या २ महिन्यांपासून हा स्पा सुरु करण्यात आला होता़. याठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाला मिळाली़. त्यांनी बनावट ग्राहक पाठवले़ मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचा बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला़. या ठिकाणी एका ३५ वर्षाची महिला तेथे आढळून आली़.तिला त्यांनी नोकरीला ठेवून पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत होता़. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक पंडित अधिक तपास करीत आहेत़.