चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; भोसरीतील प्रकार : तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:00 IST2020-03-16T18:59:40+5:302020-03-16T19:00:23+5:30
मनास लज्जा उत्पन्न होईल असे केले कृत्य

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; भोसरीतील प्रकार : तरुणाला अटक
पिंपरी : घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. भोसरी येथे रविवारी (दि. १५) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
अखिलेशकुमार देवानंदसिंग सिंग (वय २७, रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपी याने लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतून तिला जबरदस्तीने घरात घेऊन गेला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.