तीर्थक्षेत्र आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 11:11 PM2024-08-18T23:11:52+5:302024-08-18T23:13:14+5:30

आळंदीत अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे.

Sexual abuse of a minor at a pilgrimage site | तीर्थक्षेत्र आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली

तीर्थक्षेत्र आळंदीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याने एका बारा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. शनिवारी (दि. १७) पहाटे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

व्यंकटेश काशिनाथ माळनूर (रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी व्यंकटेश हा देखरेख ठेवण्याचे काम करतो. तर पीडित मुलगा अनाथ असून तो त्या संस्थेत निवास करत असून बाहेर एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता आरोपी हा पीडित मुलाच्या खोलीत आला.

त्याने मुलाला उठवून टिव्ही रूममध्ये नेले. तिथे मुलाला मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a minor at a pilgrimage site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.