लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकास सक्तमजुरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 03:06 AM2017-09-14T03:06:56+5:302017-09-14T03:07:08+5:30

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे.

 Sexual Abuse; Trainer | लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकास सक्तमजुरी  

लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकास सक्तमजुरी  

googlenewsNext

पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे़ याबाबतची हकिकत अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी सागर ढोबळेकडे कराटे प्रशिक्षकासाठी जात होती़ त्याचा येरवडा येथे क्लास होता़ त्याने या मुलीला लीडर बनविले असल्याचे खोटे सांगून तिला कराटेसाठी नवीन कपडे, टी-शर्ट वगैरे घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी लैंगिक चाळे, अश्लील कृत्य केले़ आरोपीने तिला खोटी कारणे सांगून मॉलमध्ये पिंपरी येथील एका शाळेमध्ये, डोंगराळ भागात घेऊन गेला होता़ या प्रकाराने घाबरून तिने क्लासला जाणे बंद केले होते़ मात्र, या प्रकाराबाबत तिने ताबडतोब कोणाला सांगितले नव्हते़
सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या निर्भया अभियानातंर्गत शाळेत केल्या असताना हा प्रकार समोर आला़ त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात २३ जून २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पीडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिकांसह चार साक्षीदार नोंदविले़

निर्भया अभियानामुळे गुन्हा उघडकीस
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला पोलीस अधिकारी शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलींशी संवाद साधतात़ या अभियानांतर्गत मुलींना सक्षम बनविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या येरवडा येथील शाळेत गेल्या होत्या़ त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकूण पीडित मुलीने त्यांना व मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला़ त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलवून घेतले़ तेथे या मुलीने आईवडिलांसमक्ष संपूर्ण माहिती दिली़ त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ निर्भया अभियानामुळे हा प्रकार उघडकीस आला होता़

Web Title:  Sexual Abuse; Trainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.