Child Abuse: नराधम काकाने केला ७ वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 15:36 IST2021-12-12T15:36:52+5:302021-12-12T15:36:59+5:30
लाडीगुडी लावून काकाने आपल्याच ७ वर्षाच्या पुतणीवर गेल्या ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Child Abuse: नराधम काकाने केला ७ वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार
पुणे : लाडीगुडी लावून काकाने आपल्याच ७ वर्षाच्या पुतणीवर गेल्या ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मांजरी येथील २२ वर्षाच्या दिराला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जून ते ६ डिसेंबर २०२१ दरम्यान वारंवार मांजरीतील एका सोसायटीत घडला आहे. फिर्यादी त्यांचा दिर असलेल्या आरोपीने त्यांच्या ७ वर्षाच्या मुलीला लाडीगोडी लावली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या बापाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता. मात्र, तिला त्रास होऊ लागल्याने तिने हे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.