अश्लील गाण्यांचा विद्यार्थिनींना त्रास, वालचंदनगरचा प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:51 AM2018-04-02T02:51:12+5:302018-04-02T02:51:12+5:30

- येथे जुन्या बसस्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या असतात. येथे महिला प्रवासी व विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मोठमोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवली जातात. त्यामुळे येथील महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 Sexually exploited girls have problems, Walchandnagar type | अश्लील गाण्यांचा विद्यार्थिनींना त्रास, वालचंदनगरचा प्रकार  

अश्लील गाण्यांचा विद्यार्थिनींना त्रास, वालचंदनगरचा प्रकार  

Next

वालचंदनगर - येथे जुन्या बसस्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या असतात. येथे महिला प्रवासी व विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मोठमोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवली जातात. त्यामुळे येथील महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वालचंदनगर येथे भारत चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी, श्री वर्धमान विद्यालय व कळंब येथील दोन महाविद्यालये यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची बसस्थानकावर कायम गर्दी असते. तसेच नोकरदार महिला वर्गही मोठ्या प्रमाणावर एसटी बसने प्रवास करतात.
वालचंदनगरमधील जुन्या बसस्थानकावर थांबले असता खासगी प्रवासी गाड्यांमधून अश्लील गाणी मोठ्या आवाजात लावली जातात. तसेच या गाड्यांचे चालक टिंगल टवाळी करताना दिसतात. त्यांच्याकडून असभ्य वर्तन केले जाते. त्यामुळे महिला वर्ग व विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागतो. वालचंदनगर कंपनीने प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या शेडलगतच खासगी गाड्या लावलेल्या असतात. प्रवाशांनीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहनचालकांकडून केली जाणारी अश्लिल शेरेबाजी, वेडेवाकडे हावभाव यामुळे महिलांना येथून जाणे अवघड झाले आहे. यावर कोणीही कारवाईला धजावत नाही.
वालचंदनगर पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व वालचंदनगर कंपनीच्या सिक्युरिटी विभागाकडून वालचंदनगरवासियांना त्वरित कारवाईची अपेक्षा आहे.

Web Title:  Sexually exploited girls have problems, Walchandnagar type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.