एसएफआयचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:04+5:302021-07-12T04:09:04+5:30
एसएफआयचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी हातात मागणी फलक घेऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये स्वप्नील लोणकर ...
एसएफआयचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी हातात मागणी फलक घेऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना शासनाने योग्य ती मदत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा, आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलैपर्यंत भरती केली जावी, सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे इत्यादी मागण्यांचे मागणी फलक घेऊन विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांत घरी राहून हे आंदोलन केले.
यावेळी एसएफआयचे विलास साबळे, सचिन साबळे, प्रवीण गवारी,अविनाश गवारी, समीर गारे,रुपाली खमसे, महेश गाडेकर , स्नेहल साबळे , आशा लोहकरे, अक्षय घोडे आदी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
घोडेगाव येथे एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी फलक दाखवून केलेले आंदोलन.