वरवंड व कडेठाण येथे लसीकरणावेळी सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:05+5:302021-08-18T04:16:05+5:30
वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत येणारे कडेठाण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणावेळी नो फिजिकल डिस्टंसिंग, ...
वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत येणारे कडेठाण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणावेळी नो फिजिकल डिस्टंसिंग, नियोजनाचा अभाव, ना शिस्त, अपुऱ्या लस, लांबच लांब रांगा, या उपकेंद्रावर कोणत्याही प्रकारचा नियोजन होत नसल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
लसी अपुऱ्या असल्याने अनेकांना लसी न घेता रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. या मध्ये नागरिकांना नाहक त्रास होत आहे. काही नागरिकांचे ८४ दिवस झाले आहेत त्यांना या गोंधळामुळे लस मिळण्यासाठी अडचण येत आहे.
या लसीकरणावेळी सावळा गोंधळ दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. यामुळे नागरिकांना मोकळ्या हाताने परत जावे लागले आहेत. या आरोग्य केंद्राचा नियोजन अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास झाला आहे. उपसरपंच वरवंड प्रदीप दिवेकर
वरवंड गावातील कोरोना आकडे वारी वाढत आहे त्या अनुषंगाने वरवंड येथील व्यावसायिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व वरवंड प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना व निवेदन देऊन १५ दिवस झाले आहे.
व्यापारी संघटना अध्यक्ष, बापू बारवरकर
वरवंड येथे लसीकरणावेळी लांबच लांब रांगा,
कडेठाण येथे लसी करणावेळी उडालेला गोंधळ