शाहीर जंगम स्वामींचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान मोलाचे: मखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:15+5:302021-03-23T04:10:15+5:30
भीमाई आश्रमशाळेत लोकशाहीर जंगम स्वामी यांचा स्मृतिदिन मंगळवार ( दि. २२ ) मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या ...
भीमाई आश्रमशाळेत लोकशाहीर जंगम स्वामी यांचा स्मृतिदिन मंगळवार ( दि. २२ ) मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी मखरे बोलत होते.
मखरे म्हणाले की, 'कला ही आपली आई आहे ' अशी भूमिका अंगीकारून स्वामींनी जीवनभर प्रबोधनाचे कार्य केले.
स्वामींचा १०० वा वाढदिवस भीमाई आश्रमशाळेत साजरा केला होता. त्यांची आठवण राहावी, म्हणून संस्थेच्या मुलींच्या निवासी वसतिगृहाला शाहीर नागसेन तथा जंगम स्वामी हे नाव दिले असल्याचे शेवटी मखरेंनी म्हटले आहे. यावेळी स्मृतिदिन कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अश्वजीत कांबळे व संस्थेच्या प्राचार्या, उप- प्राचार्या, मुख्याध्यापक, अधिक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले.
२२ इंदापूर मखरे
भीमाई आश्रम शाळेत शाहीर जंगम स्वामी यांना अभिवादन करताना मान्यवर