वास्तवाचे भान ठेवून शाहिरांनी पोवाडे करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:19+5:302021-04-03T04:10:19+5:30

पुणे : महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नये, कारण त्यांचे कार्य देशासाठी होते. सद्यपरिस्थितीमध्ये प्रस्थापित वर्ग समाजाची दिशाभूल करीत आहे, ...

Shahirs should be aware of the reality | वास्तवाचे भान ठेवून शाहिरांनी पोवाडे करावेत

वास्तवाचे भान ठेवून शाहिरांनी पोवाडे करावेत

Next

पुणे : महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवू नये, कारण त्यांचे कार्य देशासाठी होते. सद्यपरिस्थितीमध्ये प्रस्थापित वर्ग समाजाची दिशाभूल करीत आहे, यासाठी शाहिरांनी वास्तवाचे भान ठेवून सद्यपरिस्थितीवर पोवाडे करून जनजागृती करावी, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक भा. ल. ठाणगे यांनी केले.

महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने ज्येष्ठ शाहीर जयराम नारगोलकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन गुरुवार पेठेत करण्यात आले होते. नवोदित शाहीराला या पुरस्काराने गौरविण्यात येते. श्रीकांत शिर्के यांना यंदाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर दादा पासलकर होते. यावेळी विद्याधर नारगोलकर, राम तोरकडी, दिलीप घोलप या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर श्रीकांत शिर्के यांनी पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली.

शाहीर दादा पासलकर म्हणाले, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शिवपालखी सोहळ्यास शासन व्यवस्थेकडून परवानगी मिळाली नाही. तसेच मंदिरातसुद्धा अवघ्या ८ ते १० माणसांची परवानगी नाकारण्यात आली ही खंत यांनी व्यक्त केली.

श्रीकांत शिर्के म्हणाले, शाहिरी क्षेत्रातील माझ्या उगवत्या काळात मला ज्येष्ठ शाहीर जयराम नारगोलकर स्मृती पुरस्कार मिळाला आहे. हा माझ्या शाहिरीतील कार्याला आशीर्वाद मानतो.

Web Title: Shahirs should be aware of the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.