शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 11:05 AM2017-11-19T11:05:29+5:302017-11-19T11:05:45+5:30

घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा

Shailesh Deodhar and Maruti Pawar cleanliness brand ambassador | शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 

शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 

Next

लोणावळा : घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा  नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी मारुती पवार या दोघांची स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून लोणावळा  नगरपरिषदेने नियुक्ती केली आहे. लोणावळा शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2018 करिता जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व कळावे व त्यामधून गावठाण परिसरासह शहरात स्वच्छता नांदावी, पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छतेच्या बाबतीत देखिल नंबर एकचे शहर बनावे याकरिता लोकसहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ सुरु झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, स्वच्छता व वैद्यक समिती सभापती पुजा गायकवाड यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी प्रभागवार स्वच्छता मोहिम राबवत शहराला स्वच्छ व सुंदर तसेच हागणदारीमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थी, संस्था, संघटना यांनी देखिल यामध्ये उत्सपुर्त सहभाग घेत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने टाकण्यास सुरुवात केली आहे.

   भांगरवाडी येथिल देवधर यांनी घरात निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍यापासून घराच्या परिसरातच बायोगॅसची निर्मिती केली आहे. यामुळे कचरा जागीच विघटित होत असून बायोगॅस देखिल उपलब्ध होऊ लागला आहे. मारुती पवार या खंडाळ्यातील नगरपरिषद कर्मचार्‍यांने एका प्लास्टिक ड्रममध्ये घरात निर्माण होणारा कचरा झाडांचा पालापाचोळा यापासून खत निर्मिती करुन त्याचा वापर बागेतील झाडांसाठी केला आहे. देवधर व पवार या दोघांनी देखिल केलेले प्रयोग हे वाखण्याजोगे असल्याने त्यांची लोणावळा शहरातील स्वच्छ सर्वेक्षण 2018 करिता बॅड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या हस्ते त्यांना तसे पत्र प्रदान करण्यात आले आहे. देवधर व पवार यांनी राबविलेले प्रयोग याबाबत त्यांनी शहरवासीयांना माहिती देत त्यांना प्रयोगशिल बनविण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा मुख्याधिकारी पवार यांनी व्यक्त केली. 

Web Title: Shailesh Deodhar and Maruti Pawar cleanliness brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.