शेक्सपियर यांची जादू जगातील सर्व भाषांवर : थोरात
By admin | Published: February 20, 2017 02:18 AM2017-02-20T02:18:00+5:302017-02-20T02:18:00+5:30
शेक्सपियर यांनी आपल्या नाटकांतून प्रत्येक व्यक्तिरेखेचे जिवंत चित्रण केल्याने त्याची जादू जगातील सर्व भाषांवर आहे. इंग्रजी
लोणी काळभोर : शेक्सपियर यांनी आपल्या नाटकांतून प्रत्येक व्यक्तिरेखेचे जिवंत चित्रण केल्याने त्याची जादू जगातील सर्व भाषांवर आहे. इंग्रजी भाषेला त्यांनी नवीन शब्दांची देणगी दिली. तसेच चकाट्या पिटणे या संकल्पनेवर आधारित नाटकांची रचना केली. एकाकी जगणाऱ्याला सुरक्षितता वाटते, या संकल्पनेचा जगातील लेखक, विचारवंत, दिग्दर्शक, कवी आदींवर प्रभाव जाणवतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक थोरात यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विभागाच्या वतीने ‘शेक्सपियर आणि समकालीन साहित्य’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजिण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करताना थोरात बोलत होते.
या वेळी आपल्या मनोगतांतून त्यांनी युरोपीय देशांमध्ये आजही प्रत्येकाच्या दिवाणखान्यांतपवित्र बायबल आणी शेक्सपियर यांची नाटकांची पुस्तके संग्रही आहेत. ती धर्म आणी संस्कृतीची प्रतीके मानली जातात. संत तुकारामांनी मराठी भाषेला जे योगदान दिले, तसेच योगदान इंग्रजी भाषेला शेक्सपियर यांनी दिले.प्रास्ताविकांत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे यांनी शेक्सपियर आणि वंश, धर्म, सामाजिकता यासंदर्भात या परिषदेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)