रासायनिक कारखान्यांचा सावळागोंधळ सुरूच!, सांडपाणी आले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:46 AM2017-10-16T02:46:07+5:302017-10-16T02:46:12+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली.

 The shakyagandhal of chemical factories started !, the wastewater came on the road | रासायनिक कारखान्यांचा सावळागोंधळ सुरूच!, सांडपाणी आले रस्त्यावर

रासायनिक कारखान्यांचा सावळागोंधळ सुरूच!, सांडपाणी आले रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली. परिणामी काही कारखान्यांमधील प्रक्रिया अजून सुरू असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले असून ज्या चाºयांमधून सांडपाणी वाहून या केंद्रात येत होते त्या चाºया मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागल्याने सांडपाणी सर्वत्र पसरले आहे. मात्र हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे, हे सांगणे सध्या तरी शक्य नाही.
कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे याबाबत जनप्रक्षोभ पसरल्यामुळे संबंधित यंत्रणा जोराने कामाला लागलेली आहे. चोहोबाजूंनी वाटा बंद झाल्या असल्या तरी काही कारखाने अद्याप खोडसाळपणा करण्यातून बाहेर आलेले नाही व सांडपाणी सर्रासपणे सोडून देत आहेत. मात्र ज्या नलिकेतून हे पाणी येते ती एकत्रित असल्याकारणाने नक्की पाणी सोडतंय तरी कोण हे तपासाने निष्पन्न होणार आहे, मात्र ज्या विभागाकडे हे सोपवण्यात आले आहे, ते प्रदूषण नियंत्रण मंडळ अजून तरी कुरकुंभमध्ये दाखल झालेले नाही. त्यामुळे यावर पुढील कारवाई होईपर्यंत ग्रामस्थांमध्येदेखील संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी कुरकुंभकडे का फिरकले नाहीत, याचे कारण सध्या गुलदस्त्यातचआहे, मात्र कुरकुंभच्या ग्रामस्थांना सर्वच यंत्रणा विरोधात व्यापक मोहीम राबवणे आवश्यक झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीला कानाच्या आड घेण्याचे काम सध्या ही यंत्रणा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे, त्यामुळे अवघ्या काही दिवसांनी होणाºया बैठकीत काय होणार, हे पाहणे गरजेचे आहे.
या जनआक्रोश मोर्चामध्ये कुरकुंभ येथील बरेच तरुण सहभागी झाले होते, मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कारभारी फिरकले नाही. त्यामुळे त्यांना विचारणा केली असता काही कंपनी विरोधातच मोर्चा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी पुढील काळात फक्त काही मोजक्याच कंपनीला विरोध करून जमणार नाही, तर ज्या कंपनीतून प्रदूषणाबाबत काहीच उपाययोजना करत नाही त्यांना विरोध करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . दिवाळीच्या तोंडावर अधिकाºयांची तारांबळ कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्व कंपनीमार्फत शासकीय अधिकाºयांना दिवाळी पाकीट देण्याची प्रथा जणू पारंपरिकरीत्या येत राहिली आहे, मात्र या दिवाळीच्या सुरुवातीलाच जनआक्रोश झाल्याने या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यादरम्यान कुरकुंभमध्ये एकही अधिकारी आला नाही. परिणामी त्यांना आता गुपचूपपणे दिवाळी पाकीट पोहोचवावे लागणार असल्याची खात्रीशीर माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कंपनीच्या अधिकाºयामार्फत मिळाली आहे.

तो ग्रामस्थ कोण?
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रासाठी प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी नियुक्त केले आहेत ते या ठिकाणी आल्यावर त्यांच्यासोबत कुरकुंभ व पांढरेवाडी येथील एक ग्रामस्थ असतो. विविध कंपनीला भेट देताना हा ग्रामस्थ नेहमीच असल्यामुळे याचे व अधिकाºयांचे काय लागेबांधे आहेत, हेदेखील एक रहस्य आहे. हा अधिकारी परस्पर त्याला घेऊन सरकारी कामात त्याचा काय उपयोग करून घेतो हादेखील चर्चेचा विषय झाला आहे.

आंदोलनाचा गैरफायदा नको
कुरकुंभ येथील जनआक्रोश झाला आहे. मात्र या आक्रोशामधून कुणाचाही आर्थिक फायदा होऊ न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. कुठल्याही स्थितीत या आंदोलनाच्या माध्यमातून दलाल निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची चर्चा सुरू आहे. काही ग्रामस्थ व स्थानिक नेते या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कंपनी प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही घाबरू नका आम्ही आहे, असे सांगून मलई खातात.

Web Title:  The shakyagandhal of chemical factories started !, the wastewater came on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.