रोटरीच्या अध्यक्षपदी शालिनी पवार, तर सचिवपदी पायल भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:27+5:302021-07-01T04:08:27+5:30

रोटरी क्लबचा नुकताच ऑनलाईन पदग्रहण समारंभ झाला. या वेळी रोटरीचे माजी प्रांतपाल तथा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक ...

Shalini Pawar as President of Rotary and Payal Bhandari as Secretary | रोटरीच्या अध्यक्षपदी शालिनी पवार, तर सचिवपदी पायल भंडारी

रोटरीच्या अध्यक्षपदी शालिनी पवार, तर सचिवपदी पायल भंडारी

googlenewsNext

रोटरी क्लबचा नुकताच ऑनलाईन पदग्रहण समारंभ झाला. या वेळी रोटरीचे माजी प्रांतपाल तथा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष सुशील शहा यांनी शालिनी पवार यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला. तसेच मावळते सचिव उल्हास मिसाळ यांनी पायल भंडारी यांच्याकडे सचिवपदाचा कार्यभार सुपूर्द केला. यानंतर कार्यकारिणी सदस्यांची निवड केली. दौंड शहर व तालुक्यामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे रोटरीच्या अध्यक्षा शालिनी पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील शहा यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना मिसाळ यांनी केले आभार डॉ. राजेश दाते यांनी मानले.

रोटरी क्लब दौंडची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

शालिनी पवार (अध्यक्ष), पायल भंडारी (सचिव), सहसचिव उल्हास मिसाळ (सहसचिव), खजिनदार अस्लम शेख (खजिनदार) , अविनाश हरहरे (सहखजिनदार) , नीलम मेवानी (उपाध्यक्षा) , डॉ. विनोद पोखरणा, (कल्ब ट्रेनर), डॉ. राजेश दाते (क्लब ॲडमिन) , प्रज्ञा राजोपाध्ये (मेंबरशिप), प्रफुल भंडारी (फाऊन्डेशन), डॉ. फिलोमन पवार (सर्विस प्रोजेक्ट मेडिकल), नवनाथ गोरे (नॉन मेडिकल), राकेश अग्रवाल (यूथ सर्विस) ,अमीर शेख (पब्लिक इमेज), डॉ. मुकुंद भोर (डायरेक्टर आय टी), सुनील ढगे (पर्यावरण), किरण फराटे (सह डायरेक्टर पर्यावरण), संजय इंगळे (सार्जंट ॲट आर्म्स), पी. पी. सुशील शहा (माजी अध्यक्ष), डॉ. राजेश दाते (नियोजित अध्यक्ष).

३० दौंड

Web Title: Shalini Pawar as President of Rotary and Payal Bhandari as Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.