ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात शांभवी काळे द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:04+5:302021-06-22T04:08:04+5:30

विद्या प्रतिष्ठान संचलित भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे भोरमधील विद्यार्थिनी शांभवी काळे हिने एनसीआरएच्या वतीने जीएमआरटी खोडद येथे येथे ...

Shambhavi Kale II in online science exhibition | ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात शांभवी काळे द्वितीय

ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात शांभवी काळे द्वितीय

Next

विद्या प्रतिष्ठान संचलित भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे भोरमधील विद्यार्थिनी शांभवी काळे हिने एनसीआरएच्या वतीने जीएमआरटी खोडद येथे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५ ते ७ वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

खोडद येथे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात १० राज्यांतील ९०० विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे प्रकल्प सादर केले. ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रोईंग डॉट या नावाचे मोबाईल ॲप दिले होते. यामध्ये ५५०० दर्शकांनी आनंद घेतला. कल्पना राजे व अंजली समगीर यांनी तिला मार्गदर्शन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम गडकर यांनी तिचे अभिनंदन केले.

प्रकल्प सादर करताना शांभवी काळे.

Web Title: Shambhavi Kale II in online science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.