पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 08:57 PM2018-07-25T20:57:43+5:302018-07-25T21:08:21+5:30

स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. 

shameful traffic status of Pune, observe in environment report | पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड 

पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड 

Next

पुणे :स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. पुणे महापालिकेच्यावतीने २०१७-१८ सालच्या दरम्यान शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालात शहराचे पर्यावरण सुस्थितीत नसल्याचे अनेक पुरावे मिळत आहेत. त्यातच वाहतूक स्थितीच्या आकडेवारीने तर अक्षरशः व्यवस्थेची चिरफाड केली आहे.

शहरातील वाहनांची गती प्रति तास ३० किलोमीटर अपेक्षित असताना क्षमतेपेक्षा अधिक वाहने आणि अरुंद रस्त्यांमुळे तो केवळ १८ किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या आकडेवारीनेही मार खाल्ला असून सार्वजनिक वाहतुकीच्या ८० टक्के फेऱ्या अपेक्षित असताना त्याचे प्रमाण २६.८७ टक्के इतके अत्यल्प आहे. रिक्षासारख्या कमी आकाराच्या मात्र सार्वजनिक वाहनांची संख्या तर गरजेपेक्षा अधिक असून १००० ऐवजी १८९० वाहने सध्या वापरात आहेत. प्रत्येक रस्त्यावर १०० टक्के पादचारी आणि सायकल मार्ग गरजेचे असताना शहरात त्यांचे प्रमाण अनुक्रमे ५३ आणि ४.८टक्के इतके आहे.वाहने कमी करून पर्यावरण रक्षण आवश्यक असताना त्यांना पर्याय म्हणून पादचारी आणि सायकल मार्ग निर्माण करायला सध्या तरी महापालिका प्रशासन अपयशी ठरण्याचे दिसत आहे. या आकडेवारीसोबत शहारातील वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने बी. आर.टी. योजना, रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पर्यावरण अहवालातील आकडेवारी खालीलप्रमाणे :

सूची   सद्यस्थिती   अपेक्षित ध्येय
वाहनांची सरासरी गती  (किलोमीटर/प्रतितास)                       

18

 

30
सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीच्या फेऱ्या 

26.87%

 

80%
१५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत जाणाऱ्या फेऱ्या      

33%

 

60%
पादचारी मार्गांची लांबी  

53%

 

100%
सायकल मार्गांची लांबी

4.8%

100%

 

वाहनतळाची लांबी 

13%

  0-5%

 

लहान आकाराची सार्वजनिक वाहने  

1890 

 

1000

Web Title: shameful traffic status of Pune, observe in environment report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.