शांताबाई फेम संजय लोंढेंवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:15 AM2021-05-04T11:15:00+5:302021-05-04T11:15:00+5:30

लॉकडाऊन मुळे कमाई थांबली. भावाचा अंत्यसंस्काराला पण नव्हते पैसे

Shantabai fame Sanjay londhe doesn't have money to purchase cylinder | शांताबाई फेम संजय लोंढेंवर उपासमारीची वेळ

शांताबाई फेम संजय लोंढेंवर उपासमारीची वेळ

googlenewsNext

"मला काहीतरी मदत करा. खूप अडचणीत आहे. माझा सख्खा मोठा भाऊ वारला आहे. आणि घरात मुले उपाशी आहेत खिशात एक रुपया पण नाही. घरातील सिलेंडर संपलाय. माझे शो बंद आहेत, रेकॉर्डिंग बंद आहे काय करावं सुचेना " संजय लोंढे यांचा हा मेसेज त्यांचा परिस्थीती ची जाणिव करुन देतोय. लोककलावंत असणाऱ्या लोंढेनचं शांताबाई हे गाणं प्रसिद्ध झालं आणि त्यांचे दिवस पालटले. नवीन गाणी रेकॉर्डिंग ची संधी मिळायला लागली. पण लॉकडाऊन लागला आणि हे सगळंच थांबलं. 

साठलेल्या पैशातून पाहिले काही दिवस कसेबसे काढले. पण काम थांबलं आणि अडचणी वाढत गेल्या. वर्षभरात परिस्थीती अगदीच खालावली. ," एकही स्टुडिओ सुरू नाहीये. रेकॉर्डिंग पूर्ण बंद आहे. मध्यंतरी एखादं काम मिळालं तरी पोलीस रेकॉर्डिंग बंद करायचे. त्यामुळे उत्पन्न पूर्ण थांबले". लोंढे सांगत होते. 

लोककलावंतांची हीच परिस्थिती सांगणारं एक गाणं पण मध्यंतरी लोंढे यांनी तयार केलं. पण आपली परिस्थीती आणखी खलावेल याचा लोंढेना अंदाज नव्हता. संकट आली ती पण एका पाठोपाठ एक. एकीकडे उत्पन्न नाही त्यातच मोठा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह झाला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

" भावाचे अंत्यसंस्कार करायला पण माझा कडे पैसे नव्हते. शेवटी रुग्णालयाचा मदतीने अंत्यसंस्कार केले.पण नंतर दिवस कार्य काहीच करता आलं नाही" लोंढे सांगत होते.

आज सकाळी त्यांचा घरातला सिलेंडर संपला आहे. सकाळ पासून ७ जणांचं त्यांचं कुटुंब उपाशी आहे. लोंढे आता वाट बघत आहेत ती मदतीची.

Web Title: Shantabai fame Sanjay londhe doesn't have money to purchase cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.