शांताबार्इंनी परतवला बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:13 AM2017-08-01T04:13:00+5:302017-08-01T04:13:00+5:30
येथील हांडेवस्तीवर चरावयासाठी घेऊन गेलेल्या शेळ्यांच्या कळपातील शांताबाई मारुती जाधव यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला़
निरगुडसर : येथील हांडेवस्तीवर चरावयासाठी घेऊन गेलेल्या शेळ्यांच्या कळपातील शांताबाई मारुती जाधव यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला़ ही घटना भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली़ मात्र शांताबार्इंनी धाडस करून बिबट्याचा हल्ला परतवला़ त्यामुळे शेळी बचावली़
निरगुडसर येथील सारथी डेअरीजवळील असणाºया ठाकर समाजाच्या शांताबाई यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे़ नेहमीप्रमाणे त्या शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. हांडेवस्तीतील झुंजारराव हांडे यांच्या उसाच्या शेताच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत त्या शेळ्या चारत होत्या. त्यांचे एक शेळीचे करडू चुकल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होती. त्याचदरम्यान अचानक उसाच्या शेतातून बाहेर येऊन दुसरी शेळी बिबट्या ओढत नेत असलेले त्यांनी पाहिले़ आरडाओरडा करून हातात असलेल्या काठीच्या साहाय्याने त्या बिबट्यावर धावून गेल्या. त्यामुळे बिबट्याने तोंडात पकडलेली शेळी सोडून दिली़ शांताबार्इंनी केलेल्या धाडसाने शेळी बचावली; मात्र शेळीला दोन दात खोलवर लागले आहेत़