फिरत्या चाकावरती मिळतो मातीला आकार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:31+5:302021-01-08T04:34:31+5:30
कान्हुरमेसाई : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्वात आहे. यंदा संक्रांत १४ ...
कान्हुरमेसाई : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्वात आहे. यंदा संक्रांत १४ जानेवारीला आहे हा सण काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गावी संक्रांती करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसते.
शिरूर तालुक्यातील कानुर मेसाई येथील बाबुशा कुंभार हे जुन्या पद्धतीने चाकावर वापर करून संक्रांती तयार करत आहेत. गत काही वर्षांत यंत्राचा वापर करून मातीत ही भांडी बनवली जात असतानाच बाबुशा कुंभार हे जुन्या पध्दतीने चाकाचा वापर करून मातीच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळी मातीची भांडी तयार करीत आहेत. त्यासाठी तलावातील गाळ आणि घोड्याची लीत एकत्र करून एक दिवस भिजवून ठेवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिरत्या चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देऊन भांडी तयार करतात
तयार झालेली भांडी कावत भाजली जातात त्यामध्ये लहान डेरी मडकी चुली आधी मातीच्या भांड्यांचा समावेश आहे. सध्या संक्रांतीसाठी मडकी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे चित्र गावोगावीच्या कुंभार गल्ली दिसत आहेत.
--
विविध कारणांसाठी होतो वापर
--
संक्रातीमध्ये वापरण्यात येणारी सुगडीची भांडी अर्थात लोटकी यांचा वापर विविध कारणासाठी वर्षभर सुरू असतो. संक्रांतीमध्ये वाणाचे पूजन करण्यासाठी ही लोकटी वापरली जातात तर अंत्यविधीला रक्षाविसर्जनासाठीही अशीच लोकटी वापरली जातात. गृहशांती, वास्तुशांती तसेच आध्यात्मिक कार्यासाठी ही लोटकी वापरले जातात. त्यामुळे वर्षभर ही लोटकी तयार केली जातात. गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्या कुटुंबीयांत हा व्यवसाय सुरू असून आम्ही मटक्यांबरोबर विविध मातीची भांडी व शोभेच्या मातीच्या वस्तूही तयार करतो.
- बाबुशा शिर्के
--
०७कान्हूरमेसाई कुंभार
चाकाचा वापर करून संक्रांतीतील मातीची भांडी बनविताना कुंभार व्यवसायिक बाबुशा शिर्के.