शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:17 IST2024-12-05T19:16:16+5:302024-12-05T19:17:57+5:30
विधानसभेला वडगाव शेरीत माजी नगरसेविका रेखा टिंगरेंचे पती चंद्रकांत टिंगरेंनी भाजप मधून शरद पवार गटात प्रवेश केला होता

शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक
चंदननगर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षात प्रवेश करणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने आरोपींनी दगडफेक केल्याचा कारण पुढे आला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी रेवण तानाजी लगस (वय.२०, रा.गोकुळ नगर,कात्रज) प्राणजीत अच्युत शिंदे (वय.२४, रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी फिर्याद दिली होती.
धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत टिंगरे दांपत्याने महायतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक १९ नोव्हेंबर रोजी धानोरी महावितरण कार्यालय समोर गाडीत बसले असताना दोघांनी गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण केली ,अशी तक्रार रेखा टिंगरे यांनी दिली होती. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा थेट आरोप रेखा टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. आज विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
विधानसभा निवडणुकीत दुस-या पशात प्रवेश केल्याचा राग मनात धरून दगडफेक केल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले. -कांचन जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे