शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर, कार्यकर्ते करणार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:35 AM2023-07-31T08:35:54+5:302023-07-31T08:36:53+5:30
मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे....
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या व आंबेडकर चळवळीतील विविध पक्षसंघटना आंदाेलन करणार आहेत. मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे.
एकीकडे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंचावर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, त्यांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी पुण्यात येत आहेत.
मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुण्यात पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ भजन करून त्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहोत. निषेध म्हणून काळे कपडे परिधान करणार आहाेत, असे आंदाेलनाच्या तयारीतील कार्यकर्त्यांनी सांगितले.