"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी षडयंत्र रचले"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:40 AM2023-10-14T11:40:05+5:302023-10-14T11:41:56+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते....
धायरी (पुणे) : राज्यात २०१९ मध्ये भाजपला बहुमत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवारांनी षडयंत्र रचले. आता त्यांची काय अवस्था आहे हे सर्वजण पाहतच आहात. यंदाच्या बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्ता हा कुठल्याही संघटनेचा प्राण असतो. भारतीय जनता पक्ष तर कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे. केवळ भाजपतच कुठल्याही कौटुंबिक पार्श्वभूमीशिवाय सामान्य कार्यकर्ता आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. आगामी काळात कार्यकर्त्यांनी मोदीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अविश्रांत मेहनत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, आ. राहुल कुल, आ. भीमराव तपकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे शहराध्यक्ष वासुदेव काळे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, निवडणूक प्रकोष्ठ संयोजक सुनील कर्जतकर, योगेश टिळेकर, वर्षा तापकीर, सचिन मोरे, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, राजश्री नवले, अश्विनी पोकळे, राणी भोसले, दत्तात्रय कोल्हे आदींसह पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय आणि संघटनात्मक बांधणी जोरात सुरू
वॉरियर संवाद, बुथ सशक्तीकरण आढावा, भारतीय जनता पार्टी आपल्या दारी, घर चलो अभियान, मेरी मिट्टी मेरा देश आदी कार्यक्रम राबवत भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. लोकसभेला काही अवधी असतानाही आतापासून भाजपने राजकीय आणि संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे.