शरद पवार यांची कोविड सेंटरला २५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:19+5:302021-05-29T04:10:19+5:30
कोरोना संकट आल्यापासूनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शन कोविड उपचारासाठी ...
कोरोना संकट आल्यापासूनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शन कोविड उपचारासाठी रामबाण उपाय ठरले होते. यावेळी पवार यांनी सर्वसामान्य बारामतीकरांसाठी १०० इंजेक्शन मोफत उपलब्ध केले होते. यंदाच्या वर्षी देखील रेमडेसिविरचा तुटवडा सुरु असताना पवार यांनी सुमारे ४५० इंजेक्शन पाठवत कोरोना संकटात बारामतीला मदतीचा हात दिला होता. त्यापाठोपाठ आता थेट २५ लाखांची मदत केली आहे. त्यामुळे कोविडमुक्त बारामतीसाठी या निधीची मदत होणार आहे.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांना सातव यांनी या उपक्रमाची माहिती घेतली होती. त्यानंतर पवार हे गुरुवारी (दि २७) रात्री येथील गोविंदबाग निवासस्थानी मुक्कामी आले आहेत. त्यांनी सातव यांना बोलावून हा २५ लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी या प्रसंगी उपस्थित होते.
धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलला शरद पवार यांनी आज २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करीत मदत केली. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव आणि अन्य.
२८०५२०२१ बारामती—१८