पंतप्रधानपदासाठी शरद पवार पात्रच : डॉ. प्र. चिं. शेजवलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:57 PM2018-12-27T12:57:32+5:302018-12-27T12:57:51+5:30

१९५८ ते १९६२ या काळात शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो...

Sharad Pawar is eligible for PM's post: Dr. p.c. Shejwalkar | पंतप्रधानपदासाठी शरद पवार पात्रच : डॉ. प्र. चिं. शेजवलकर

पंतप्रधानपदासाठी शरद पवार पात्रच : डॉ. प्र. चिं. शेजवलकर

Next
ठळक मुद्दे‘मसाप गप्पा’मध्ये उलगडला जीवनप्रवास

पुणे : ‘मला अनेक दिग्गज नेते आणि समाजसुधारकांचा सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरीसाठी घेतलेली मुलाखत, साने गुरूजी यांचे प्रेम एस. एम. जोशी यांचा स्वीय सहायक असताना लाभलेला सहवास अशा अनेक गोष्टी आजही आठवतात. १९५८ ते १९६२ या काळात शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो. त्या काळीच ही व्यक्ती पुढे जाऊन देशाचा नेता होईल, असे त्यांच्याकडे असलेल्या गुणांवरून हेरले. त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळे ते पंतप्रधान पदासाठी लायकच आहेत’, अशी टिपण्णी ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्रा. प्र. चिं. शेजवलकर यांनी केली. 
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात शेजवलकर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. व्यवस्थापन क्षेत्र, मराठी मुलांची मानसिकता, दिग्गजांचा सहवास आणि प्रपंच सांभाळत केलेली प्राध्यापकी या सर्वच पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. संजय गोखले यांनी शेजवलकर यांच्याशी संवाद साधला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.
शेजवलकर म्हणाले, ‘मराठी मुले अजूनही नोक-यांच्या मागे का पळतात, हा प्रश्न आहे. इतर समाजातील मुलांना उच्चशिक्षण घेऊनही नोक-यांत रस नसतो. मराठी माणसांनी ही मानसिकता आता बदलायला हवी. उद्योजक समाजाची प्रगती घडवत असतात. त्यात मराठी मुलांचा वाटाही असला पाहिजे. त्यांनी स्वत:चा उद्योग स्थापन करून तो वाढवावा. मला पुढील प्रत्येक जन्मी शिक्षक व्हायचे आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत. आज अनेक क्षेत्रांत त्यांनी केलेली प्रगती पाहतो, तेव्हा गहिवरून येते. कामाचे समाधान वाटते.’
‘पुरोगामी असल्याने आंतरजातीय विवाहाला माझी कधीच ‘ना’ नव्हती; पण ते जसे वडिलांना कळले, तसे त्यांनी धसकाच घेतला. मुलीचे वडील जसे  मुलींसाठी वर शोधतात, तसे माझे वडील माझ्यासाठी वधू शोधत फिरत होते. लग्नाआधी पत्नीला पहायला गेलो, तेव्हा चहा देऊन ती मागे वळली. मला तिचे केस आवडले आणि मग केसांनीच माझा गळा कापला’, असे सांगताच शेजवलकर यांच्या पत्नी उषा शेजवलकर यांच्यासह संपूर्ण सभागृह खळखळून हसले.

Web Title: Sharad Pawar is eligible for PM's post: Dr. p.c. Shejwalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.