शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:42 AM2023-01-09T10:42:43+5:302023-01-09T10:42:51+5:30

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ सदस्यांच्या समितीत रोहित पवार यांची क्लब गटातून निवड करण्यात आली

Sharad Pawar grandson is now chosen Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Association | शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीची बैठक रविवारी गहुंजे स्टेडियमवर झाली. या आधी बैठकीत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ सदस्यांच्या समितीत रोहित पवार यांची क्लब गटातून निवड करण्यात आली. त्यानंतर, त्यांची अध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली.

अधिकृत घटनेच्या वादात गेली दोन वर्षे अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय यशस्वी ठरला. महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनू सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही.

खासदार शरद पवार यांनीही मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तयारी केली होती. भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. शरद पवार यांच्या सहकार्याने आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट संघटनेवर निवड झाली. आता शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचाही क्रिकेटच्या मैदानात प्रवेश झाला आहे.

दरम्यान, राेहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून एमसीएच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल एमसीएच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांनी या खेळासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांचे मार्गदर्शन अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसेच एमसीएचे सदस्य व पदाधिकारी यांचीही या निवडणुकीत मदत झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील.

खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे. पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तशी संधी मिळाली. आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं. ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसलं तरी आदरणीय पवार साहेबांच्या रूपातील सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहूनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील असे रोहित पवार यांनी सांगितले आहे. 

Web Title: Sharad Pawar grandson is now chosen Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.