पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:38 PM2024-06-16T12:38:52+5:302024-06-16T12:40:05+5:30

पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा अनेक निकषांवर उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येण्याचा पक्षाचा विश्वास

Sharad Pawar group is sure to win in Pune 6 constituencies sought for assembly | पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

पुणे : मतदारसंघातील पक्षाची ताकद, उपलब्ध सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा विविध निकषांवर शहरातील आठपैकी सहा विधानसभा मतदासंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar Group) पक्षाचे उमेदवार उभे करावेत, अशी मागणी पक्षश्रेष्ठींना करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) यावरून राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) एकत्र लढण्याची भूमिका मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली असताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून ही मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शनिवारी (दि. १५) झालेल्या बैठकीत शहरातील आठही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

त्यात पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा अनेक निकषांवर शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. असा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कुमार गोसावी, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar group is sure to win in Pune 6 constituencies sought for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.