पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वडगाव शेरीत मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:33 PM2024-11-19T16:33:04+5:302024-11-19T16:34:00+5:30

वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारेंना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरेंच्या पतीवर अज्ञातांनी भरदुपारी हल्ला केला

Sharad Pawar group leader car attacked in Pune There is great excitement in Vadgaon Sherry | पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वडगाव शेरीत मोठी खळबळ

पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वडगाव शेरीत मोठी खळबळ

किरण शिंदे 

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेशकरून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी भरदुपारी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. याघटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा प्रवेशकरून वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा प्रचार सुरू केला होता. 

दरम्यान, प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्यानंतर गाठीभेटीवर भरदिला जात आहे. मतदार राजाला प्रत्यक्ष भेटले जात आहे. चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कार चालक सचिन गायकवाड दुपारी एमएसईबी ऑफिसकडे गेले होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईने उतरले व पाठिमागे गेले, त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याघटनेमुळे वडगाव शेरी परिसरात चांगलाच वातावरण गरम झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Web Title: Sharad Pawar group leader car attacked in Pune There is great excitement in Vadgaon Sherry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.