पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!
By विश्वास मोरे | Published: September 18, 2023 10:26 AM2023-09-18T10:26:02+5:302023-09-18T10:27:27+5:30
शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत...
पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी लक्ष घातले आहे. आज त्यांची पहिली पत्रकार परिषद होत आहे. शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजकारणामध्ये पवार कुटुंबाचे योगदान, महत्त्व मोलाचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. याच पिंपरी- चिंचवड शहरात आता राष्ट्रवादीची दोन कार्यालये झाली आहेत. याआधी पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाने नव्याने पक्ष कार्यालय उभारलं असून काही दिवसांमध्येच त्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट!
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं बघायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या विकासामुळे ओळखले जाते. गेल्या ३० वर्षांमध्ये शरद पवार यांनी सत्तेची सुत्रे अजित पवार यांच्याकडे सोपवली होती. मात्र, दोन महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्याने शरद पवार यांनी पुन्हा या गडावर लक्ष केंद्रीत केले आहे. सत्तेची सूत्र नातू रोहित पवार यांच्याकडे सोपवल्याची दिसून येत आहे.
नवीन कार्यालयाचा शोध!
एक वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन कार्यालय निर्माण करण्यात आली. त्यानंतर आता शहरामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन कार्यलये होणार आहेत. मोरवाडीत असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार राष्ट्रवादी गटाला दुसरीकडे कार्यालय शोधावा लागणार आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी माहिती दिली आहे.