संकट हातळण्याच्या हातोटीमुळे शरद पवार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:39+5:302021-08-23T04:12:39+5:30

बारामती: किल्लारीला झालेल्या भूकंपाचे संकट शरद पवारांनी चांगल्या प्रकारे हाताळले होते. रात्रंदिवस राबून पुन्हा तेथील लोकांना उभे केले. त्यामुळे ...

Sharad Pawar is the head of disaster management due to his ability to handle the crisis | संकट हातळण्याच्या हातोटीमुळे शरद पवार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख

संकट हातळण्याच्या हातोटीमुळे शरद पवार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख

Next

बारामती: किल्लारीला झालेल्या भूकंपाचे संकट शरद पवारांनी चांगल्या प्रकारे हाताळले होते. रात्रंदिवस राबून पुन्हा तेथील लोकांना उभे केले. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख केले, अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.

बारामती येथील रुई रुग्णालय येथील कोविड-१९ च्या रुग्णांसाठी १०० खाटांचे नवीन पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटलचे उद्धाटन शनिवारी (दि. २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे कंट्री डायरेक्टर मॅथ्यू जोसेफ, मास्टरकार्डचे हेड गव्हर्नमेंट एंगेजमेंटस साऊथ एशिया आर. बी. संतोषकुमार, मास्टरकार्डचे डायरेक्टर अर्यन मोबीलीटी निशांत गुप्ता, 'एआयएफ'च्या मॅनेजर स्टॅटेजिक पार्टनरशीप सीमा व्यास, 'एआयएफ' प्रोजेक्ट हेड, ह्युमॉनिरीटीयन प्रोग्रॅम विनय लियर, डेप्युटी रिजनल डायरेक्टर, हॅबीटंट फॉर ह्युमिनीटी इंडीयाचे जॉन मॅथ्यू, नगराध्यक्ष पौणिमा तावरे, सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, रुईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, बारामतीमध्ये 'सीएसआर'च्या माध्यमातून आणि अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने रुई रुग्णालयाशेजारी १०० बेडचे पोर्टेबल कोविड केअर युनिट उभारण्यात आले आहे. ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. या सुविधेचा लाभ गरीब व गरजू नागरिकांना मिळावा. कोरोनाचे संकट आल्यानंतर आरोग्य सुविधा किती गरजेची आहे हे आपणाला कळाले. नागरिकांनी निरोगी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेवटी उपमुख्यमंत्री पवार यांनी या हॉस्पिटलच्या उभारणीत योगदान दिलेल्या मान्यवरांचे बारामतीकरांच्या वतीने आभार मानले. या वेळी मॅथ्यू जोसेफ आणि संतोष कुमार यांनी अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या वतीने देशात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. प्रस्ताविक डॉ. मनोज खोमणे यांनी केले.

नवीन पोर्टेबल मॉड्युलर रुग्णालयाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार

२२०८२०२१-बारामती-०१

Web Title: Sharad Pawar is the head of disaster management due to his ability to handle the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.