Sharad Pawar: संभाजी भिडेंना व्यक्तीश: ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:17 PM2022-05-05T14:17:47+5:302022-05-05T14:19:14+5:30

कोरेगाव-भीमा चौकशीच्या पार्श्वभूमीवर पवार यांची आज आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात आली

Sharad Pawar: I don't know Sambhaji Bhide personally, Sharad Pawar made it clear | Sharad Pawar: संभाजी भिडेंना व्यक्तीश: ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar: संभाजी भिडेंना व्यक्तीश: ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

पुणे - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर विनायक कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव-भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे न आढळल्याने भिडे यांचे नाव वगळल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे २०१८ साली घडलेल्या हिंसाचार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी आता संभाजी भिडेंना आपण व्यक्तीश: ओळखत नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.   

कोरेगाव-भीमा चौकशीच्या पार्श्वभूमीवर पवार यांची आज आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांनी चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना आपण व्यक्तीश: ओळखत नाही. वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्द वाचल्यामुळे त्यांच्याबद्दल मला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  

कोरेगाव-भीमा दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती. याप्रकरणात ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिली. ठाण्यातील ॲड. आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.

पवारांनी माफी मागावी - चौगुले

कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
 

Web Title: Sharad Pawar: I don't know Sambhaji Bhide personally, Sharad Pawar made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.