Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:12 AM2024-06-12T10:12:45+5:302024-06-12T10:13:00+5:30
Sharad Pawar Purandar tour पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवार हे संवाद साधणार
नीरा : राज्यासह पुरंदर तालुक्यात यावर्षी दुष्काळ पडला आहे. पुरंदर तालुक्याच्या (Purandar) दक्षिण पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आज बुधवारी (ता. १२) परिसरातील गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत(Sharad Pawar Purandar tour). नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुतारीच्या निनादात पवारांचे स्वागत उपसरपंच राजेश काकडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केले.
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील नीरा- कोळविहिरे या जिल्हा परिषद गटाचा दुष्काळी पाहणी दौरा आज शरद पवार करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. नीरा येथून सकाळी साडेनऊ वाजता हा दौरा सुरू झाला आहे. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांसह मोठ्या संख्येने नीरा ग्रामस्थ उपस्थित होते. नीरा येथील भेटीनंतर वाल्हे येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये परिसरातील शेतकरी बांधवांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित केला आहे. वाल्हे येथील शेतकरी मेळाव्यानंतर वागदरवाडी मार्गे, बहिर्जीचीवाडी, मोरूजीचीवाडी, बाळाजीचीवाडी, राख, नावळी, कोळविहिरे या गावांमधून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे हनुमंत पवार यांनी सांगितले.