निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 07:12 PM2023-10-01T19:12:29+5:302023-10-01T19:13:27+5:30

आंबेगाव तालुक्यात सभा घेणार ; जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी कडे राहणार

sharad pawar said will attend election commission hearing with lawyer | निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार

निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार

googlenewsNext

नारायणगाव :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात सुरु असलेल्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीस येत्या ६ ऑक्टोबरला आपण वकिलासह उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करीत , भाजपा सोबत गेलेले राष्ट्रवादीत असूच शकत नाही , अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी शिरोली बुद्रुक ( ता. जुन्नर ) येथे जाहीर केली .

जुन्नर येथील आयोजित आदिवासी राष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमापूर्वी  उपस्थित राहण्यासाठी शरद पवार हे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी थांबले होते , यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली . यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आंबेगाव बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, पांडुरंग पवार , सुरज वाजगे सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी  व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

शरद पवार म्हणाले कि , आजचे राज्यकर्ते आदिवासींना आदिवासी म्हणत नाही तर ते वनवासी म्हणतात, आदिवासींना वनवासी म्हणणे ही गोष्ट त्यांना मंजूर नाही, जल , जंगल , जमीन यांचे मालक हे आदिवासी आहेत असे सांगत बिरसा ब्रिगेड मध्ये नेतृत्व करणारी मंडळी ही डॉक्टर , इंजिनियर आहेत , ते आदिवासीच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करीत आहेत , असे पवार यांनी स्पष्ट केले .

आंबेगाव तालुक्यात पहिली सभा घेण्याचे जाहीर केले होते , यावर बोलताना आंबेगाव तालुक्यात लवकरच सभा घेण्याचे सुतोवाच केले , सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात की शरद पवार माझ्या हृदयात आहेत यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्यावेळी मतदान करण्याची वेळ येईल , तेव्हा कोण कुठे कोणाच्या हृदयात आहे हे स्पष्ट होईल . , मी राज्यभर फिरतोय , सर्वसामान्यांचे मत पाहता , लोकांची भावना अनुकूल आहेत , त्यांच्या भावनेमध्ये सत्य आहे . कोणी वेगळे भूमिका घेतली असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे , त्यावर आपण भाष्य करणार नाही असे स्पष्ट करून पण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर सुद्धा संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादीचे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे .

जुन्नर विधानसभेच्या जागे बद्दल बोलताना पवार म्हणाले कि , महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जुन्नर विधानसभेची जागा हि मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिल , असे जाहीर केले . अतुल बेनके यांची तटस्थ भूमिकेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की , जुन्नर तालुक्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना कुठे व कोणाकडे जावे हे स्पष्ट केले आहे , त्यामुळे बेनके यांनी भूमिका जाहीर केली असावी असे मत व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुण्यात दुसऱ्यांदा येत आहेत , यावर बोलताना पवार यांनी पंतप्रधान आल्यावर रस्ते तयार होतात , खड्डे बुजवले जातात ही चांगली बाब आहे असे सांगत या विषयाला बगल दिली . आंबेगाव तालुक्यातनं देवदत्त निकम यांना उमेदवारी देणार का? याविषयी या विषयावर त्यांनी बोलण्याचे टाळले . राज्य आणि देशात विरोध लाट लक्षात घेता २०२४ ला लोकांना परिवर्तन हवे आहे , असे पवार यांनी स्पष्ट केले  .

Web Title: sharad pawar said will attend election commission hearing with lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.