"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:43 IST2024-04-29T13:41:05+5:302024-04-29T13:43:54+5:30
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते...

"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
रेडणी (पुणे) : दिल्लीमध्ये २०१७ साली शरद पवारांसोबत आमच्या उपस्थित भाजपबरोबर एक मिटिंग झाली. त्यात विधानसभा, लोकसभा व मंत्रीपदे सगळे ठरले होते, पण नंतर पवार साहेबांनी शब्द फिरवला. मी हे खरे बोलतोय, हवे तर शरद पवारांची आणि माझी दोघांचीही ब्रेन मॅपिंग (नार्को) टेस्ट करा, खरे काय ते कळेल, अशा शब्दांत शरद पवारांवर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.
शनिवारी दि. २७ रोजी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शरद पवार यांनी पु.लो.द.चे सरकार स्थापन करताना भाजपबरोबर हात मिळवणी केली ते संस्कार. २०१४ साली भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला ते संस्कार. पहाटेचा शपथविधी त्यांच्या संमतीने झाला ते संस्कार आणि आम्ही भाजपबरोबर गेलो ती गद्दारी कशी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, प्रवीण माने, श्रीमंत ढोले, चित्रलेखा ढोले, नवनाथ पडळकर, अतुल झगडे उपस्थित होते.