शरद पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे राष्ट्रवादी प्रवेशावेळी गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:22 PM2021-06-25T20:22:04+5:302021-06-25T20:23:46+5:30

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवारांची कौतुकाची थाप

Sharad Pawar is 'Undoubtable Hero of Indian Politics': Former Union Minister Subodh Mohite | शरद पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे राष्ट्रवादी प्रवेशावेळी गौरवोद्गार

शरद पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे राष्ट्रवादी प्रवेशावेळी गौरवोद्गार

Next

पुणे : लोकसभेत सुबोध मोहिते यांचे काम पाहिले आहे. त्यांची टीम चांगली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कायम त्यांच्या पाठीशी राहील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचे स्वागत केले. 

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयात मोहिते यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. समवेत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचीही घोषणा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यावेळी केली. खासदार वंदना चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,मोहिते यांनी केंद्रात मंत्री असताना चांगले काम केलेले पाहिले. नवे कोणी काही चांगले करत असेल तर त्याचे कौतुक वरिष्ठ करतात. मी ही त्यावेळी त्यांचे केले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत याचा आनंद आहे. पक्ष कायम त्यांच्या पाठीशी असेल अशी खात्री त्यांना देतो.

मोहिते म्हणाले, पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' आहेत. आता माझे उर्वरित आयुष्य त्यांच्याबरोबर काढणार आहे. विदर्भात शिवसेनेचा पहिला खासदार होतो. काम करण्याची उमेद आहे. इथेही चांगले काम करून दाखवणार असा शब्द देतो.

सुबोध मोहिते यांची आतापर्यंतचा राजकीय प्रवास

शिवसेनेकडून लढताना सुबोध मोहिते हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले होते. मात्र, पुढे त्यांना लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये यश मिळविता आले नाही. मोहिते हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूरच होते. अखेर पुन्हा एकदा राजकीय कारकीर्द सुरुवात करताना त्यांनी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

मोहिते यांचा आतापर्यंत शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्यासोबत मोहिते यांनी शिवसेनेला पक्षाला जय महाराष्ट्र करत रामराम ठोकला होता.

 

Web Title: Sharad Pawar is 'Undoubtable Hero of Indian Politics': Former Union Minister Subodh Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.