शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार

By श्रीकिशन काळे | Published: June 29, 2024 03:17 PM2024-06-29T15:17:48+5:302024-06-29T15:18:28+5:30

आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो...

Sharad Pawar will run in Wari; Participate in the activity 'Experience Vari for one day' | शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार

शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार

पुणे : वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार समूजन घेण्यासाठी प्रत्येकाने 'एक दिवस तरी वारी अनुभवावी'. नागरिकांना वारीचा अनुभव घेता यावा म्हणून खास ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असा उपक्रमच सुरू आहे. त्यात सहभागी होऊन दिवसभर चालून वारी समजून घेता येते. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. या वारीमध्ये बारामती ते सणसर दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार सहभागी होणार आहेत.

आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होतील.

हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष असून शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते. यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात ७ जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांनी उपक्रमामध्ये सहभागी होऊ असे आश्वासन दिले आहे.

संविधान-समता दिंडी-

गेली पाच वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडी असते. संतांनी आपल्या अभंग, ओव्या, ग्रंथातून समता, बंधूत्व, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य याचा जो विचार मांडला आहे, त्यांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे, हे संविधान कीर्तन-प्रवचनातून लोकांसमोर मांडले जाते. संविधान समता दिंडी ही पुण्यातून पंढरपुरपर्यंत जाते, अशी माहिती संविधान समता दिंडीचे चालक ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांनी दिली.

Web Title: Sharad Pawar will run in Wari; Participate in the activity 'Experience Vari for one day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.