शरद पवारांच्या बारामतीचे पाणी 'आटले'; उद्यापासून एक दिवसाआड पुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 08:34 PM2022-09-19T20:34:22+5:302022-09-19T20:34:54+5:30

Baramati Water Shortage: शहरातील भागांना आलटून पालटून पाणी पुरवठा होणार आहे.

Sharad Pawar's Baramati facing water shortage in Rainy season; water supply after one day gap from Tuesday | शरद पवारांच्या बारामतीचे पाणी 'आटले'; उद्यापासून एक दिवसाआड पुरवठा होणार

शरद पवारांच्या बारामतीचे पाणी 'आटले'; उद्यापासून एक दिवसाआड पुरवठा होणार

googlenewsNext

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्याबारामतीला भर पावसाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. साठवण तलावात निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने उपलब्ध पाणी साठा मर्यादित आहे. यामुळे पाणीपुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे.

त्यानुसार बुधवारी (दि २१) खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूररोड, एस. टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर आदी. 

तसेच गुरुवारी (दि. २३) खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणीपुरवठा होईल. कचेरीरोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबिर बोळ महावीर पथ, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदूळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली, नेवसेरोड. संपूर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, माळेगावरोड, जामदाररोड, खंडोबानगर जवाहरनगर, पोस्टरोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवणरोड, सिद्धार्थनगर. तरी वरीलप्रमाणे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
 

Web Title: Sharad Pawar's Baramati facing water shortage in Rainy season; water supply after one day gap from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.